Excellent
Based on 170 reviews
Pankaj Surwade
Pankaj Surwade
09/04/2024
We already received recommendation from our relative about Dr Manoj Dongare and here is our personal experience now as below.Dr Manoj is an excellent Dr,he is friendly nice human being ,nice advise gives.he gives sufficient time to patient ,answer all questions.help what every he can .Dr studies the patient and gives exact report. After surgery we like clear instructions to hospital staff everyday personal visit and followup on diet medicine amazing.It is good to see my father is walking and improving his daily life.one of the best Dr visited so far.the best part Dr remembers the history of the case so feel like meeting our family member.very much recommended.best wishes dr for the future .
Bp Lohani
Bp Lohani
02/04/2024
Dr Manoj was very attentive and calm throughout the process.
RAJESH ZIRPE
RAJESH ZIRPE
29/03/2024
The doctor is excellent. Very nice treatment. The surgery is done flawless. We are heartily thankful to him for his work.
Dinesh Jadhav
Dinesh Jadhav
26/03/2024
our experience was good . They were very careful and handled the present situation and the hospital staff was in good communication as well as treatment and solutions.
Rahul Jadhav
Rahul Jadhav
18/03/2024
Excellent
Mahesh Tike
Mahesh Tike
17/03/2024
Dr Manoj Dongare is highly skilled , well experienced Surgeon. Excellent treatment with patient , he is one of the best doctor cum human being. life point hospital ( wakad ) and it’s entire staff especially brother, sisters , doctors and canteen staff has excellent behaviour with patient and relatives . Staff is truely caring and always prioritising for patients health. Thank you very much Dr Dongare and his caring staff.
Rupali Bhalerao
Rupali Bhalerao
12/03/2024
Wonderful experience with Dr.D.Y.Patil hospital , pimpri pune. First of all thanks to Dr.Ashutosh Kulkarni,Pirangut pune,he gave reference of Dr.Manoj Dongare Sir.we met the Dr.Manoj Dongare Sir ,we asked him all the questions about the surgery and after effects of the surgery he listen all the questions and give them all answers after solving all the doubts we decide to go through the surgery and all went very good. today more than the one week is gone and I am now as good as new.. Dr. manoj Dongare sir is a wonderful surgeon, and the staff is always helpful and kind. Overall, we had a fantastic experience with Dr.Manoj sir and we highly recommend him to anyone . He is a talented, compassionate, and skilled surgeon who genuinely cares about his patients. Thank you so much Sir 🙏
Punam Sahane
Punam Sahane
08/03/2024
डॉक्टर डोंगरे सर नुकताच डॉक्टर डोंगरे सरांना भेटण्याचा योग आला. पेशंट शी सुसंवाद,उत्तम भाषा कौशल्य,अतिशय सोप्या भाषेत पेशंट व नातेवाईकांना आजाराबद्दल व उपचारांची माहिती सांगण्याची हातोटी व त्याच्या जोडीला उत्तम व जलद उपचार यंत्रणा यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.. धन्यवाद डॉक्टर साहेब.
null

M/s Khedkar

Gall-Bladder & Pancreas Cancer Surgery

खेडेकर आजी‌ ३ महिने हसणं विसरून गेले होते समोर आलेलं संकट स्वादुपिंड व पित्ताशय कॅन्सर सगळे संपले ‌आजींना वाटले पहिले १ ऑपरेशन फेल झाले २ /३ लाख रुपये खर्च करून झाला होता आता पैसे शिल्लक नाही कुटुंबातील सदस्य आता थकले होते तब्बेत खराब झाली होती. त्यानंतर त्यांनी  त्यांना WMO च्या माध्यमातून डॉ मनोज डोंगरे याना संपर्क केला व उपचारांसाठी डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी ला ऑडमिट झाले.  डॉ मनोज डोंगरे सर यांनी यशस्वी रित्या ऑपरेशन केले व त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ पण मिळाला.

null

Old Grandmother

Stomach Cancer

आजींना पोटदुकींचा नेहमी त्रास होत होता त्या नाॅरमल गोळ्या खावून आपले रोजची शेतामधली काम ते करत होते. काही दिवसांपूर्वी अचानक पोटा मध्ये पाणी झाले व डॉक्टरांनी पोटातील पाणी काढले. पण पुढील काही तपासण्या केल्यानंतर पोटा मध्ये कॅन्सर च्या गाठी तयार झाल्या आहेत व ऑपरेशन करवे लागणार आहे.  त्यांना काय करावे हे सुचत नव्हते त्यानंतर त्यांनी डडॉ मनोज डोंगरे सरांशी डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पिंपरी येथे संपर्क केला. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघून काही तपासणी केल्या व ऑपरेशन चा सल्ला दिला. दोन दिवसानंतर ऑपेरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि त्यांना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त केले आणि आजी पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या आहे व पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.

एक वयोवृद्ध आजोबा यांना पोटाचा कॅन्सर होता आणि त्यांना काय करावे हे ठरवता येत नव्हते. त्यानंतर त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डॉ.मनोज डोंगरे यांना भेट दिली. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व तपासणी करण्यास सांगितले. त्यांनी अगोदर एक कॅन्सर शस्त्रक्रिया व हदय वाॅल रिपलेसमेंन्ट शस्त्रक्रिया केली होती. त्यांनतर पुन्हा शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे व ती खूप गुंतागुंतीची होती. डॉ.मनोज डोंगरे यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले व अतिशय गुंतागुंतीची कॅन्सर शस्त्रक्रिया यशस्वी केली. आज ते पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहे व ते पुन्हा सामान्य जीवन जगत आहे. दैनंदिन जीवनात व आपल्या आसपास खुप लोकांकडे ऑपरेशन साठी पैसे नाहीत यामुळे ते उपचारापासून वंचित आहे. महात्मा जन धन यॊजनॆ अंतर्गत अल्पदरात कॅन्सर सारख्या आजारावर उपचार केले जातात.आपल्या आसपास असे कोणी रुग्ण आपल्या जवळ असतील तर त्यांना आजच डॉ मनोज डोंगरे यांच्याशी संपर्क करायला सांगा.

null

Patient from Baramati

बारामती मधील एक युवकाला डॉक्टरांनी कॅन्सर झाल्याचं सांगितल आहे व ऑपेरेशन करण्याचा सल्ला दिला. तो युवक पुण्या मध्ये रिक्षा चालवायचं काम करत असतो, परिस्थिती नाजूक असल्यामुळे तो ऑपेरेशन करू शकत नव्हता. त्यानंतर त्याने व त्यांच्या कुटूंबियांनी WMO च्या माध्यमातून डॉ मनोज डोंगरे यांना डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी येथे संपर्क केला. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघितले व त्याला ऑपेरेशन साठी ऍडमिट पण करून घेतले. काही दिवसांपूर्वी डॉ मनोज डोंगरे सर यांनी यशस्वी रित्या ऑपरेशन केले व त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ पण मिळाला. दैनंदिन जीवनात व आपल्या आसपास खुप लोकांकडे ऑपरेशन साठी पैसे नाहीत यामुळे ते उपचारापासून वंचित आहे. महात्मा जन धन यॊजनॆ अंतर्गत अल्पदरात कॅन्सर सारख्या आजारावर उपचार केले जातात.आपल्या आसपास असे कोणी रुग्ण आपल्या जवळ असतील तर त्यांना आजच डॉ मनोज डोंगरे यांच्याशी संपर्क करायला सांगा.
null

Mr. Shivaji

Stomach Cancer

शिवाजी वय वर्षे 21 पोटाच्या कॅन्सर मुले त्रस्त होता. शिवाजी व त्यांच्या कुटूंबियांनी अनेक ठिकाणी उपचार केले पण काही फरक पडत नव्हता. नाशिक व पुणे मध्ये अनेक हॉस्पिटल मध्ये उपचार घेतले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डॉ.मनोज डोंगरे यांना भेट दिली. डॉ मनोज डोंगरे सरानी चेक-कप करून त्यांना ऑपेरेशन चा सल्ला दिला. दोन दिवसानंतर ऑपेरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि त्यांना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त केले आणि तो पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे व तो पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.

null

Shubham Kharat

Liver & Kidney Cancer

महाराष्ट्रातील लातूर येथील श्री शुभम खरात यांना कावीळ, यकृत आणि किडनीच्या समस्या होत्या आणि त्यांना काय करावे हे ठरवता येत नव्हते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई, औरंगाबाद आणि इतर शहरांना भेटी दिल्या पण काही उपयोग झाला नाही. मुंबई मध्ये आजाराचे ‌निदान झाले पोटाच्या रक्तवाहिन्या फुटल्या आहेत आणी त्या मुळे किडणी पित्तशय ह्दय यांवर परिणाम होत आहे ते ऑपरेशन करने गरजेचे आहे. त्यानंतर त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डॉ.मनोज डोंगरे यांना भेट दिली. डॉ.मनोज डोंगरे यांनी शुभमला रुग्णालयात दाखल करून यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि तो पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे व तो पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.

null

Patient from Aurangabad

औरंगाबाद येथील ६० वर्षाचे एक गृहस्थ यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागला होता व सर्व तपासण्या केल्यानंतर लिव्हर सिरोसिसचे (हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (लिव्हरच्या डाव्या लोबमधील गाठ) निदान झाले. हे ऐकून त्यांना व त्यांच्या सर्व कुटूंबियांना आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यांना पूर्वीपासून कोणताही आजार नव्हता तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला, कोणी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा तर कोणी पशन करण्याचा सल्ला दिला. ते पूर्णपणे गोधंळून गेले होते. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघून काही तपासणी केल्या. PET स्कॅनमध्ये इतरत्र कोणताही आजार लिव्हरच्या डाव्या लोबमध्ये आणि मेजर पोर्टल हायपरटेन्शनचा कोणताही पुरावा दिसला नाही. डॉ मनोज डोंगरे सरांनी त्यांना लिव्हर रिसेकशन (Liver resection) म्हणजेच लिव्हर चा डावा भाग काढून टाकण्याचा सल्ला दिला व त्यांच्या कुटूंबियांना सर्व बाबी समजून सांगितल्या. एक महिन्यापूर्वी डॉ मनोज डोंगरे सरांनी खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली‌ आणि आज ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहे व पुन्हा सामान्य जीवन जगत आहे. आपल्या आसपास असे कोणी रुग्ण ज्यांना लिव्हर व कॅन्सरचा त्रास आहे तर त्यांना आजच डॉ मनोज डोंगरे यांच्याशी संपर्क करायला सांगा. गरीब आणि गरजूंसाठी सरकारी योजनांच्या (महात्मा फुले जन आरोग्य योजना) मदतीने उपचारांना अनुदान दिले जाऊ शकते.
null

Patient from Jalgaon

जळगाव येथील पवन सनांसो लिव्हर च्या आजारने ग्रस्त होता. पवन व त्यांच्या कुटूंबियांनी ४/५ महिने अनेक ठिकाणी उपचार केले पण काही फरक पडत नव्हता. पण पुढील काही तपासण्या केल्यानंतर असे निदर्शनास आले कि लिव्हर वर व स्वादुपिंडा वर गाठ आहे तीचे ऑपरेशन करावे लागणार आहे. त्यांना काय करावे हे सुचत नव्हते त्यानंतर त्यांनी डॉ मनोज डोंगरे सरांशी डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पिंपरी येथे संपर्क केला. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघून काही तपासणी केल्या व ऑपरेशन चा सल्ला दिला. डॉ मनोज डोंगरे सरांनी महात्मा फुले योजनेअंतर्गत यशस्वी रित्या ऑपरेशन पार पडले आणि त्यांना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त केले. पवन पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे व पुन्हा सामान्य जीवन जगत आहे. आपल्या आसपास असे कोणी रुग्ण ज्यांना लिव्हर व कॅन्सरचा त्रास आहे तर त्यांना आजच डॉ मनोज डोंगरे यांच्याशी संपर्क करायला सांगा. गरीब आणि गरजूंसाठी सरकारी योजनांच्या (महात्मा फुले जन आरोग्य योजना) मदतीने उपचारांना अनुदान दिले जाऊ शकते.
null

Cancer Surgery

33 वर्षीय गृहस्थांना पोटात सतत दुखण्याचा त्रास होत होता. अनेक ठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्यांचा त्रास काही कमी झाला नाही. काही डॉक्टरांनी त्यांना सी टी स्कॅन करण्यास सांगितले, त्यामध्ये त्यांना ट्युमर (कॅन्सर ची गाठ) आहे असे निदर्शनास आले. त्यांनी व त्यांच्या कुटूंबियांनी कॅन्सर उपचारासाठी लगेच काही डॉक्टरांना भेट दिली आणि त्यानंतर त्याला यकृत काढण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांना या शस्त्रक्रियेच्या उच्च जोखमीबद्दल आणि मृत्यूची शक्यता देखील सांगितली गेली. त्यानंतर त्यांनी डॉ मनोज डोंगरे यांसोबत डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी येथे संपर्क केला. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघितले व त्यांना कॅन्सर ची शस्त्रक्रिया बद्दल पूर्ण माहिती दिली व त्यांना शस्त्रक्रियेसाठी ऍडमिट करून घेतले. काही दिवसांपूर्वी डॉ मनोज डोंगरे सर यांनी यशस्वी रित्या ऑपरेशन केले व त्यांना 10 दिवसात डिस्चार्ज देण्यात आला. आपल्या आसपास असे कोणी रुग्ण असतील ज्यांना कॅन्सर व लिव्हर यासंदर्भात काही तक्रारी असतील तर त्यांना आजच डॉ मनोज डोंगरे यांच्याशी संपर्क करायला सांगा.
null

Old Grandmother

Esophagus Cancer

आजी मुंबई वरुन आली होती. तिला अन्ननलिकेचा कॅन्सर होता आणी ऑपरेशन करावे लागणार होते. तिला अन्न गिळताना खूप त्रास होत होता. आजीची परिस्थती अत्यंत नाजूक होती. त्यानंतर तिचा डॉ मनोज डोंगरे सरांशी डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पिंपरी येथे संपर्क केला. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघून काही तपासणी केल्या व ऑपरेशन चा सल्ला दिला. डॉ मनोज डोंगरे सरांनी महात्मा फुले योजनेअंतर्गत यशस्वी रित्या ऑपरेशन पार पडले.  ५ दिवस व्हेंन्टिलेटर वर काही दिवस ऑक्सिजन’वर ठेवले आणि त्यांना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त केले आणि आजी पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या आहे व पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.

null

Patient from Aurangabad

औरंगाबाद येथील एक पेशंट रुपेनवर_धोंडाबाई यांना कॅन्सर चे निदान झाले होते आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च जवळपास चार ते पाच लाख सांगितला होता पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनी ऑपरेशन करायचं थांबविले होते. त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना काय करावे हे सुचत नव्हते. त्यानंतर त्यांनी WMO च्या माध्यमातून डॉ मनोज डोंगरे यांना डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी येथे संपर्क केला. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघितले व त्यांना ऑपेरेशन साठी ऍडमिट पण करून घेतले. काही दिवसांपूर्वी डॉ मनोज डोंगरे सर यांनी यशस्वी रित्या ऑपरेशन केले व त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ पण मिळाला.
null

Patient from Akluj

Breast Cancer

अकलूज (तालुका माळशिरस) येथील मगर आजी यांना ब्रेस्ट कॅन्सर होता. अनेक ठिकाणी उपचार केले पण काही फरक पडत नव्हता. त्यानंतर त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डॉ.मनोज डोंगरे यांना भेट दिली. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघून काही तपासणी केल्या व ऑपरेशन चा सल्ला दिला. आठ दिवसांपूर्वी ऑपेरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि त्यांना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त केले आणि आजी पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या आहे व पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.

null

Patient Varsha

वर्षा (वय १७ वर्ष) तिने 12 वी परीक्षा उत्तीर्ण झाली पुढे खुप शिकायचं मोठ‌ होयच हि‌ तीची‌ इच्छा पण अचानक पोट दुखायला लागले व सर्व तपासण्या केल्यानंतर समजले कि पोटात 3 स्टेझ चा‌ आतडिचा कॅन्सर आहे. तिच्या कुटूंबियांनी अनेक ठिकाणी उपचार केले पण काही फरक पडत नव्हता. त्यानंतर त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डॉ.मनोज डोंगरे यांना भेट दिली. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघून काही तपासणी केल्या व ऑपरेशन चा सल्ला दिला. डॉ.मनोज डोंगरे सरांच्या पुढे खुप मोठे अहवान होते तीला‌ तर वाचवायचे ‌आणी गर्भाशय सुध्दा वाचवायचं. त्यांनी खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली‌ आणि त्यांना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त केले. आज ती पूर्णपणे बरी होऊन घरी परतली आहे व पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.
null

Liver Transplant

काही दिवसांपूर्वी एक 50 वर्षीय गृहस्थ डॉ मनोज डोंगरे यांच्याकडे उपचारासाठी आले होते. त्यांना यकृताचा सिरोसिस (Liver Cirrhosis) चा त्रास होता आणि त्यांचे लघवीचे प्रमाण कमी झाले होते. काही तपासणी केल्यांनतर असे आढळून आले कि त्यांची किडनी निकामी झाली आहे त्यांनतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि यकृताची किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना 5 दिवसात वॉर्डमध्ये स्थानांतरित करण्यात आले आणि नंतर एका आठवड्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे व ते आता यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे. आपल्या आसपास असे कोणी रुग्ण असतील ज्यांना कॅन्सर व लिव्हर यासंदर्भात काही तक्रारी असतील तर त्यांना आजच डॉ मनोज डोंगरे यांच्याशी संपर्क करायला सांगा.